भजनी मालिका
← भजनांकडे परत

येऊनि नरदेहा झांकितील डोळे । बळें चि अंधळे होती लोक

yeuni naradeha jhankitil dole | balen chi andhale hoti lok

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
येऊनि नरदेहा झांकितील डोळे । बळें चि अंधळे होती लोक ॥१॥ उजडासरसी न चलती वाट । पुढील बोभाट जाणोनियां ॥ध्रु.॥ बहु फेरे आले सोसोनि वोळसा । पुढें नाहीं ऐसा लाभ मग ॥२॥ तुका म्हणे जाऊं सादावीत वाट । भेटे तरी भेटो कोणी तरी ॥३॥