भजनी मालिका
← भजनांकडे परत

येथीचिया अलंकारें । काय खरें पूजन

yethichiya alankaren | kay kharen pujan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
येथीचिया अलंकारें । काय खरें पूजन ॥१॥ वैकुंठींच्या लावूं वाटा । सर्व साटा ते ठायीं ॥ध्रु.॥ येथीचिया नाशवंतें । काय रितें चाळवूं ॥२॥ तुका म्हणे वैष्णव जन । माझे गण समुदाय ॥३॥