भजनी मालिका
← भजनांकडे परत

योगाचें तें भाग्य क्षमा । आधीं दमा इंद्रियें

yogachen ten bhagya kshama | adhin dama indriyen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
योगाचें तें भाग्य क्षमा । आधीं दमा इंद्रियें ॥१॥ अवघीं भाग्यें येती घरा । देव सोयरा जालिया ॥ध्रु.॥ मिरासीचें म्हूण सेत । नाहीं देत पीक उगें ॥२॥ तुका म्हणे उचित जाणां । उगीं सिणा काशाला ॥३॥