भजनी मालिका
← भजनांकडे परत

येऊनि नरदेहा विचारावें सार । धरावा पैं धीर भजनमार्गा

yeuni naradeha vicharaven sar | dharava pain dhir bhajanamarga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
येऊनि नरदेहा विचारावें सार । धरावा पैं धीर भजनमार्गा ॥१॥ चंचळ चत्तिासी ठेवूनियां ठायीं । संतांचिये पायीं लीन व्हावें ॥ध्रु.॥ भावाचा पैं हात धरावा नश्चियें । तेणें भवभय देशधडी ॥२॥ नामापरतें जगीं साधन सोपें नाहीं । आवडीनें गाई सर्वकाळ ॥३॥ तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा । ऐसा नश्चियाचा मेरु जाला ॥४॥