भजनी मालिका
← भजनांकडे परत

येतील अंतरा शिष्टाचे अनुभव । तळमळी जीव तया सुखा

yetil antara shishtache anubhav | talamali jiv taya sukha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
येतील अंतरा शिष्टाचे अनुभव । तळमळी जीव तया सुखा ॥१॥ आतां माझा जीव घेउनियां बळी । बैसवावें वोळी संतांचिये ॥ध्रु.॥ विस्तारिली वाचा फळेंविण वेल । कोरडे चि बोल फोस वांझे ॥२॥ तुका म्हणे आलों निर्वाणाचे वरी । राहों नेदीं उरी नारायणा ॥३॥