भजनी मालिका
← भजनांकडे परत

येथे आड कांहीं न साहे आणीक । प्रमाण तें एक हें चि झालें

yethe ad kanhin na sahe anik | praman ten ek hen chi jhalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
येथे आड कांहीं न साहे आणीक । प्रमाण तें एक हें चि झालें ॥१॥ गाऊं नाचु टाळी वाहू गीत छंदें । डोलावूं विनोदें अंग तेणें ॥ध्रु.॥ मथुनियां सार काढिलें बाहेरी । उपाधि ते येरी निवडिल्या ॥२॥ तुका म्हणे जना लाविली शिराणी । सेवितां हे धणी होत नाहीं ॥३॥