भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

धराल जरी चित्तीं न लगेचि तरी वेळ । आहेती सकळ कळा हातीं ॥१॥ क्षणेचि सगुण क्षणेंचि निर्गुण । क्षणेंचि प्रसन्न होतां दासा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

धराल तरी धराल चित्तीं । संशय निवुत्ती करुनियां ॥१॥ या हो विठोबाच्या नामें । साधनें दुर्गमें लाजविलीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

धरिती ज्या हातीं संत कृपावंत । पाळी पंढरीनाथ लळा त्याचा ॥१॥ न विसंबे त्या घडी पळ युग मानी । दिसों नेदी जनीं किविलवाणें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

धरुनि हातीं हात पोरा धरिसी चिकाटी । न सुटेसि मग बाळिया सांपडता मुष्टी ॥१॥ धरिसी तरी धरि एक हरी चित्तीं मनीं । नाहीं तरी अहंकार गोविल वेसनिं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

धरुनियां श्वास पोटीं सेवो पहासी हाल । न पवसी स्थळ भोंवतां गडियांचा मेळ ॥१॥ हुतुतु हुतुतु किती करिसी वेळोवेळां । होऊनियां नम्र भजे घननीळ सांवळा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

धांवोनि मी येतो परि नेणें मारग । तूंचि लागवेग करीं आतां ॥१॥ अनाथ मी दीन रंक शरणांगत । म्हणूनियां त्वरित सांभाळावें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ध्यानीं चिंतनी मानसीं । हरितें ध्याता अहर्निशीं । तोचि होऊनिया भक्तरासी । झाले विठठलिं विठ्ठल ॥१॥ कीटकी भृंगी ऐशी रुप । तीव्र ध्यानें ते तद्रुप । विष्णु जेवीं शिवस्वरुप । शिवहि विष्णु चिंतनें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ध्यानीं रंगले मानस । जिव्हें नावांचा उल्हास । कीर्तन आवडे श्रवणांस । नेत्रही स्वरुपास भाळलें ॥१॥ वाचा लांचावली गुणा । तुमच्या नामसंकीर्तना । देह घाली लोटांगणा । मस्तक चरणां सोकावला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा