भजनी मालिका
← भजनांकडे परत

ध्यानीं चिंतनी मानसीं । हरितें ध्याता अहर्निशीं । तोचि होऊनिया भक्तरासी । झाले विठठलिं विठ्ठल

dhyanin chintani manasin | hariten dhyata aharnishin | tochi houniya bhaktarasi | jhale vithathalin viththal

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ध्यानीं चिंतनी मानसीं । हरितें ध्याता अहर्निशीं । तोचि होऊनिया भक्तरासी । झाले विठठलिं विठ्ठल ॥१॥ कीटकी भृंगी ऐशी रुप । तीव्र ध्यानें ते तद्रुप । विष्णु जेवीं शिवस्वरुप । शिवहि विष्णु चिंतनें ॥२॥ नर तोचि नारायण । अर्जुनरुपें विलसे कृष्ण । येरे येरे विराजमान । करितां ध्यान तद्रुपता ॥३॥ निरसोनियां अविदयाजात । देव तैसेचि झाले भक्त । मोहममता कामातीत । जाले सतत निजध्यासें ॥४॥ निळा म्हणे अर्धनारी । रुप विलसें नटेश्वरीं । दोनि दाउनी एक शरीरीं । दोघां नाहीं दोनिपणें ॥५॥