भजनी मालिका
← भजनांकडे परत

धर्म तरी आहे ऐसा । मार्ग सहसा रक्षावा

dharma tari ahe aisa | marga sahasa rakshava

रचनाकार: संत निळोबा · अभंग
धर्म तरी आहे ऐसा । मार्ग सहसा रक्षावा ॥१॥ नाहीं तरी भांबावती । अवघी भरती आडरानें ॥२॥ म्हणोनियां माझा करा । विश्वभरां सांभाळ ॥३॥ निळा म्हणे येतां लोकां । अनुभव शंका फिटेल ॥४॥