भजनी मालिका
संत नरहरी

संत नरहरी

या संतांची भजने

अनुहात ध्वनी करित निशिदिनीं । मन हें लुब्धुनी गेलें तया ॥ १ ॥ अखंड हें मनीं स्मरा चिंतामणी । ह्रदयीं हो ध्यानीं सर्वकाळ ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

ऊठ बा होय जागा पहा वासुदेवाला सुदिन उगवला दान आपुले घाला ॥ १ ॥ आणिक हिता गा आला अवचित फेरा । हे घडी सांपडेना कांही दान पुण्य करा ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

काय तुझी थोरी वर्णूं मी पामर । होसी दयाकर कृपानिधी ॥ १ ॥ तुजसरशी दया नाहीं आणिकासी । असे ह्रषीकेशी नवल एक ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

कृपाळु समर्था सद्‍गुरु अनंता । गुरु कृपावंता दया करीं ॥ १ ॥ अनाथ अपराधी तारी हा भवाब्धी । मृगजळ नदी तारी देखा ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

चंद्रभागा तीर्थ पुरविला हेत । मनींचा मनोरथ अंतरींचा ॥ १ ॥ स्नान संध्या केली संध्यावळी झाली । गई वळत्या केली गोपाळपुरीं ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

चरणीं ठेविले पद्मतीर्थ झालें । गरुडपारीं केलें रामतीर्थ ॥ १ ॥ भागीरथीतीरीं राम धनुर्धारी । अहिल्या उद्धरी क्षणमात्रें ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

चित्तार्‍या चितरें काढी भिंतीवरी । तैसें जग सारे अवघे हें ॥ १ ॥ पोरें हो खेळती शेवटीं मोडिती । टाकूनियां जाती आपुल्या घरा ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

जग हें अवघें सारें ब्रह्मरूप । सर्वांभूतीं एक पांडुरंग ॥ १ ॥ अणुरेणू पर्यंत ब्रह्म भरीयेलें । सर्वांघटीं राहिलें अखंडित ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

धन्य पुंडलिक भक्त निवडला । अक्षयीं राहिला चंद्रभागीं ॥ १ ॥ भक्त नामदेव अक्षयीं जडला । पायरी तो झाला महाद्वारीं ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

नव्हें तें सगुण नव्हे तें निर्गुण । जाणती हे खूण तत्त्वज्ञानी ॥ १ ॥ आहे तें अंबर निःशब्द निराळ । अद्वय केवळ जैसें तैसे ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

नाम हे नगरी वैकुंठ पंढरी । नांदता श्रीहरी पांडुरंग ॥ १ ॥ नरदेहीं जन्मले पंढरीस गेले । दृष्टीभरि पाहिले पांडुरंग ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

नाशिवंत देह मनाचा निश्चय । सद्‍गुरूचे पाय ह्रदयीं असो ॥ १ ॥ कलीमध्यें फार सद्‍गुरू हा थोर । नामाचा उच्चार मुखीं असो ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी