भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपाळु समर्था सद्‍गुरु अनंता । गुरु कृपावंता दया करीं

krupalu samartha sad‍guru ananta | guru krupavanta daya karin

रचनाकार: संत नरहरी · अभंग
कृपाळु समर्था सद्‍गुरु अनंता । गुरु कृपावंता दया करीं ॥ १ ॥ अनाथ अपराधी तारी हा भवाब्धी । मृगजळ नदी तारी देखा ॥ २ ॥ दीनाचा दयाळु भक्तांचा कनवाळु । करितां सांभाळु हरिभक्ताचा ॥ ३ ॥ हरिनाम उच्चारी देव कृपा करी । भक्तांचा कैवारी पांडुरंग ॥ ४ ॥ कृपाळु भगवंते पुरविला हेत । मुखीं नामामृत नरहरी ॥ ५ ॥