भजनी मालिका
← भजनांकडे परत

जग हें अवघें सारें ब्रह्मरूप । सर्वांभूतीं एक पांडुरंग

jag hen avaghen saren brahmarup | sarvambhutin ek pandurang

रचनाकार: संत नरहरी · अभंग
जग हें अवघें सारें ब्रह्मरूप । सर्वांभूतीं एक पांडुरंग ॥ १ ॥ अणुरेणू पर्यंत ब्रह्म भरीयेलें । सर्वांघटीं राहिलें अखंडित ॥ २ ॥ विश्व हें व्यापिलें भरूनी उरलें । कवतुक दाविलें मायाजाळ ॥ ३ ॥ भ्रांती मायाजाळ काढता तात्काळ । परब्रह्मीं खेळे अखंडित ॥ ४ ॥ अखंडित वस्तु ह्रदयीं बिंबली । गुरुकृपें पाहीं नरहरी ॥ ५ ॥