भजनी मालिका
← भजनांकडे परत

चित्तार्‍या चितरें काढी भिंतीवरी । तैसें जग सारे अवघे हें

chittar‍ya chitaren kadhi bhintivari | taisen jag sare avaghe hen

रचनाकार: संत नरहरी · अभंग
चित्तार्‍या चितरें काढी भिंतीवरी । तैसें जग सारे अवघे हें ॥ १ ॥ पोरें हो खेळती शेवटीं मोडिती । टाकूनियां जाती आपुल्या घरा ॥ २ ॥ तैसे जन सारे करिती संसार । मोहगुणें फार खरें म्हणती ॥ ३ ॥ कैसी जड माती चालविली युक्ति । नानापरी होती देह देवा ॥ ४ ॥ कांहीं साध्य करा साधुसंग धरा । नाम हें उच्चारा नरहरी म्हणे ॥ ५ ॥