भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

विठ्ठलाचे पाय धरूनियां राहें । मग संसार तो काय करील तुझें ॥१॥ संसाराचें भय नाहीम हरिचे दासा । विठु आह्मां सरिसा निरंतर ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विठ्ठलेंविण जया न गमे एक घडी । सर्वस्व आवडी विठ्ठालाची ॥१॥ विठ्ठालचि माता विठ्ठालचि पिता । भगिनी आणि भ्राता विठ्ठालचि ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विठ्ठाल विसांवा सकळिकां । विठ्ठाल आधार तिही लोकां । विठ्ठाल नकळे ब्रह्मांदिकां । विठ्ठाल रेखा पंढरीये ॥१॥ विठ्ठाल डोळस सांवळा । विठ्ठाल धरारे मानसीं । विठ्ठाल सोडवील अहर्निशीं । विठ्ठालावीण मुक्ति कैंची । कुंटणी गणिकेसी उद्धरिलें ॥३॥

रचनाकार: संत नामदेव

विधी वेद विरुद्ध संपर्क संबंध । नाहीं भेदाभेद स्वस्वरुपीं ॥१॥ अविधि आचरण परम दूषण । वेदोनारायण बोलियेला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विनविति संत आणिक सज्जन । नव्हे समाधान कांहीं केल्या ॥१॥ नानाचि प्रकार करितसे घोर । कांहीं केल्या स्थिर चित्त नव्हे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विप्र वेष तेव्हां घेऊनि निघाला । गोकुळासी आला लागवेगें ॥१॥ पुत्रोत्सव कोठें लोकांला पुसत । भावीत सांगत नंदाघरीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विमानांची दाटी अंतरिक्षीं देव । करिताती सर्व गर्भ-स्तुती ॥१॥ सत्रा अक्षरांत असे तुझी मूर्ति । यज्ञेशा तुजप्रती नमो नमो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विमानीं बैसली विठ्ठल सुखमूर्ती । घेतला निवृत्ति मध्यभागीं ॥१॥ राही रखुमाई बैसले सुरगण । उठलीं विमानें गंधर्वांचीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विरंचीचा बाप क्षीरसागरवासी । ध्याती योगी त्यासी निरंतर ॥१॥ परेहूनिपर वैखरीहूनि दुरी । कौसल्येचे उदरीं तोचि असे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विश्वजनमोहना कपटिया नारायणा । काय देवपणा मिरवितोसी ॥१॥ दर्शना आलिया हृदयीं संचरसी । देहभावा घेसी हिरोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विश्वंभर नाम तुझें कमळापती । जगीं श्रुति स्मृति वाखाणिती ॥१॥ गौळियां घरींचें दहीं लोणी चोरूनी । खातां चक्रपाणि लाजसी ना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विश्वाचा जो बाप हातीं ज्याच्या सूत्र । ह्मणवितो पुत्र नंदजीचा ॥१॥ तीर्थें ज्याच्या चरणीं करीतातीं न्हाणीं । य-शोदा जननी म्हणताती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विश्वाच्या मोहना कपट नाटका । पंढरीनायका पांडु-रंगा ॥१॥ अवतार धरूनि होऊनि निमित्त । बुजविसी दैत्य सर्प खाणी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विष पाजावया पूतना ते आली । ते तुवां तारिली काय म्हणुनि ॥१॥ पुसा या म्हणोनि वेश्या बोभाईलि । ती तुवां तारिली काय म्हणूनि ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विषय तडातोडी करि माझे मन । राहिलें म्हणोन तुझे पाइं ॥१॥ नको नको देवा वासनेचा संग । मज आला दुभंग नारायणा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विषय सेवितां तुज । नव्हे पुढील काज । कदा न भेटे तुज । गरुडध्वज निश्चयेंसी ॥१॥ काय करिसी खटपत । वांयां मार्ग दुर्घट । वरपडा होसील कष्ट । परि संसार न सुटेचि ॥२॥

रचनाकार: संत नामदेव