भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्वाच्या मोहना कपट नाटका । पंढरीनायका पांडु-रंगा

vishvachya mohana kapat nataka | pandharinayaka pandu-ranga

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विश्वाच्या मोहना कपट नाटका । पंढरीनायका पांडु-रंगा ॥१॥ अवतार धरूनि होऊनि निमित्त । बुजविसी दैत्य सर्प खाणी ॥२॥ गोपिकांचे घरीं कामासी लंपट । करिसी धीट गवळि-यांसी ॥३॥ भाव अभावाचा न करी कंटाळा । दावि बाळलीला ह्मणे नामा ॥४॥