भजनी मालिका
← भजनांकडे परत

विमानीं बैसली विठ्ठल सुखमूर्ती । घेतला निवृत्ति मध्यभागीं

vimanin baisali viththal sukhamurti | ghetala nivrutti madhyabhagin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विमानीं बैसली विठ्ठल सुखमूर्ती । घेतला निवृत्ति मध्यभागीं ॥१॥ राही रखुमाई बैसले सुरगण । उठलीं विमानें गंधर्वांचीं ॥२॥ गोपाळांचे भार उठले तातडीनें । चालिलीं विमानें सुरवरांचीं ॥३॥ आतां त्वरें चला तुम्ही सप्तश्रृंगा । कार्य हें गोविंदा सिद्धि न्यानें ॥४॥ आदि माया तेथें होईल दर्शन । संत साधुजन भेटतील ॥५॥ नामा म्हणे धन्य तुझ्या योगें हरी । तीर्थयात्रा सारी घडली आम्हां ॥६॥