भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्वाचा जो बाप हातीं ज्याच्या सूत्र । ह्मणवितो पुत्र नंदजीचा

vishvacha jo bap hatin jyachya sutra | hmanavito putra nandajicha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विश्वाचा जो बाप हातीं ज्याच्या सूत्र । ह्मणवितो पुत्र नंदजीचा ॥१॥ तीर्थें ज्याच्या चरणीं करीतातीं न्हाणीं । य-शोदा जननी म्हणताती ॥२॥ वेडावला शेष शिणले वेद चारी । निजे मांडीवरी यशोदेच्या ॥३॥ शरणागता देत क्षीरसिंधु जाण । चोखी-तसे स्तन आवडीनें ॥४॥ त्रैलोक्याचा राजा वर्णूं काय रंक । ऐकावें जातक नामा ह्मणे ॥५॥