भजनी मालिका
← भजनांकडे परत

विनंति करी मंदोदरी । परिसा स्वामी दशकंधरि

vinanti kari mandodari | parisa svami dashakandhari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विनंति करी मंदोदरी । परिसा स्वामी दशकंधरि ॥१॥ वांयां आणिली जानकी घरीं । लाज झाली तिहीं लोकीं ॥२॥ मज पाहातां हे विवसी । क्षय आणिला कुळासी ॥३॥ आभिलाषितां पर सती । हे तों नव्हे राजनीती ॥४॥ कोण आमुचा हितकरू । सांगे निर्मळ विचारू ॥५॥ नामया स्वामीसी शरण जावें । स्वहित आपुलें करावें ॥६॥