भजनी मालिका
← भजनांकडे परत

विमानांची दाटी अंतरिक्षीं देव । करिताती सर्व गर्भ-स्तुती

vimananchi dati antarikshin dev | karitati sarva garbha-stuti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विमानांची दाटी अंतरिक्षीं देव । करिताती सर्व गर्भ-स्तुती ॥१॥ सत्रा अक्षरांत असे तुझी मूर्ति । यज्ञेशा तुजप्रती नमो नमो ॥२॥ साहाजणें भांडती नवजणी स्थापिती । न कळे कोणा-प्रती अंत तुझा ॥३॥ अठराजण तुझी वर्णिताती कीर्ति । गुणातीता श्रीपति नमो तुज ॥४॥ चौघां जणां तुझा न कळेचि पार । श्रमसी वारंवार आह्मांसाठीं ॥५॥ अठयांशीं सहस्र वर्णिताती तुज । ब्रह्मां-डाचें बीज तुज नमो ॥६॥ जन्ममरणाचें नाही तया भय । आठविती पाय तुझे जे कां ॥७॥ नवजणी तुझ्या पायीं लोळताती । परब्रह्म मूर्ति तुज नमो ॥८॥ नामा ह्मणे ऐशी करिताती स्तुती । पुष्पें वाहूनि जाती स्वस्थळासी ॥९॥