भजनी मालिका

भजने

कायिक वाचिक मानसिक भाव । ठेवीं हा निःसंदेह देवापायीं ॥१॥ काय उणें मग न लगे सांकडें । उगवेल कोंडें द्वैतांचें तें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कारणा कारण वारीयेलें जेथें । जातों तेणें पंथे संतसंगे ॥१॥ संती हे पईल लाविले निशाण । ते खुण पाहोन नाम गर्जे ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

कांरे तूं शिणतोसि घरदार बंधनें । वांयांचि व्यसनें आणितोसी ॥१॥ भजें यादवराया लागें त्याच्या पायां । आणिक उपायां करूं नको ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कार्तिकी एकादशी । पोहा मिळाला पंढरिसी । ते-थील महिमा वंर्णू कैसी । ब्रह्मादिकां न वर्णवे ॥१॥ दिंदया गरुड -टक्यांचे भार । मृदंग वाजती अपार । वैष्णव नाचती जयजयकार । नादें अंबर गर्जतर्स ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कार्तिकीचा सोहळा । चला जाऊं पाहूं डोळां । आले वैकुंठ जवळां । सन्निध पंढरीये ॥१॥ पीक पिकलें घुमरी । प्रेम न समाये अंबरीं । अवघी मातली पंढरी । घरोघरीं सुकाळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कार्य कर्ता आणि कारण । त्रिगुणेशीं त्रिपुटी शुन्य ॥१॥ अंगीं गुण आदळतां तिन्हीं गुण । जया चित्तवृत्ति नोहे भिन्न ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कालिंदीचे डोहीं काळियाची वस्ती । ऐक परीक्षिती चरित्र हें ॥१॥ पक्षीश्वापदांनीं सोडियेलें स्थळा । निघताती ज्वाळा तया डोहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कालिंदीचे तीरीं वस्त्रें ठेविताती । जळांत रिघती सक-ळीक ॥१॥ गडयांसमवेत आला तेथें कृष्ण । करावया पूर्ण व्रत त्यांचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काली माजुम घेतला होता । गडियांसवें म्यां नेणतां । तेणेंचि आजि माझिया चित्ता । झाला विभ्रम ऐशापरी ॥१॥ न यें सोडाल आजि तरी । तुमचे घरीं न करीं चोरी । मस्तक ठेवितों पायांवरी । करा उपकार आजि मज ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

काल्याचिये आसे । देव जळीं जाले मासे । पुसोनियां हांसे । टिरीसांगातें हात ॥१॥ लाजे त्यासि वांटा नाहीं । जाणे अंतरीचें तें ही । दीन होतां कांहीं । होऊं नेदी वेगळें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम