भजनी मालिका
← भजनांकडे परत

कालिंदीचे डोहीं काळियाची वस्ती । ऐक परीक्षिती चरित्र हें

kalindiche dohin kaliyachi vasti | aik parikshiti charitra hen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कालिंदीचे डोहीं काळियाची वस्ती । ऐक परीक्षिती चरित्र हें ॥१॥ पक्षीश्वापदांनीं सोडियेलें स्थळा । निघताती ज्वाळा तया डोहीं ॥२॥ विषाचियायोगे झाडें जळताती । जीवन न घेती कोणी त्याचें ॥३॥ वैकुंठनायक तया वनीं आला । गोपाळांचा मेळ बरोबरी ॥४॥ हुहुतु हमामा लपंडाई खेळती । देवासी ह्मणती लपें आतां ॥५॥ तृषाक्रांत गाई झाले ते गोपाळ । पिती तेव्हां जळ कालीयाचें ॥६॥ लहानालीं मुलें नाहीं तया ज्ञान । झाले गतप्राण सकळांचे ॥७॥ नामा ह्मणे तेव्हां कृपादृष्टी पाहात । उठवी समस्त गायी गडी ॥८॥