भजनी मालिका
← भजनांकडे परत

कार्तिकी एकादशी । पोहा मिळाला पंढरिसी । ते-थील महिमा वंर्णू कैसी । ब्रह्मादिकां न वर्णवे

kartiki ekadashi | poha milala pandharisi | te-thil mahima vanrnu kaisi | brahmadikan na varnave

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कार्तिकी एकादशी । पोहा मिळाला पंढरिसी । ते-थील महिमा वंर्णू कैसी । ब्रह्मादिकां न वर्णवे ॥१॥ दिंदया गरुड -टक्यांचे भार । मृदंग वाजती अपार । वैष्णव नाचती जयजयकार । नादें अंबर गर्जतर्स ॥२॥ उपजोनियां संसारीं । वेळोवेळां पाहारे पंढरी । विठ्ठलराज भीमातीरीं । वाट पाहे भक्तांची ॥३॥ कल्प-तरु चिंतामणी । घरीं कामधेनूची दुभणी । मोतियांचे चौक राजांगणीं । वृंदावनें शोभती ॥४॥ संत बैसले पद्मासनीं । राया विठ्ठला तुझे चरण ध्यानीं । हरिकीर्तन ऐकोनी कानीं । अंत:करणीं निवाले ॥५॥ जें जें चिंतन मानसीं । तें फळ पावलें अहर्निशीं । मुक्ति देऊनि तयासी । अढळपदीं बैसविलें ॥६॥ सकळ तीर्थें म-ध्यानकाळीं । येती चंद्रभागे जवळी । विमानें येती अंतराळीं । देव स्रानें करिताती ॥७॥ धन्य धन्य ऐसें चंद्रभागा तीर्थ । तेथें चतु-र्भुज होती प्राणिमात्र । ऐसें आणिक नाहीं क्षेत्र । भूवैकुंठ पंढरी ॥८॥ मणिकर्णि वैतरणी । स्रान करिजेली अंत:करणीं । लीन होईल विठ्ठल चरणीं । पायाधुणी होईल ॥९॥ अनंत जन्मांचा उपाव । नामया स्वामि पंढरीराव । देईल वैकुंठीं ठाव । पुनर्जन्म चुकवील ॥१०॥