भजनी मालिका
← भजनांकडे परत

कालिंदीचे तीरीं वस्त्रें ठेविताती । जळांत रिघती सक-ळीक

kalindiche tirin vastren thevitati | jalant righati sak-lik

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कालिंदीचे तीरीं वस्त्रें ठेविताती । जळांत रिघती सक-ळीक ॥१॥ गडयांसमवेत आला तेथें कृष्ण । करावया पूर्ण व्रत त्यांचें ॥२॥ वस्त्रें घेवोनियां चढे वृक्षावरी । घाबरल्या नारी पाहो-नियां ॥३॥ वस्त्रें देईं आतां आमुचीं मुकुंदा । जाउनियां नंदा सांगों आतां ॥४॥ अच्युता अनंता कृष्णा गरुडध्वजा । दासी आह्मी तुझ्या सकळिका ॥५॥ वाजतसे सीत जाऊं पाहे प्राण । यशोदेची आण तुज असे ॥६॥ ऐकोनियां ऐसें नामा ह्मणे हांसे । धर्म सांगतसे तयांलागीं ॥७॥