भजनी मालिका
← भजनांकडे परत

कारणापें असतां दृष्टी । शंका पोटीं उपजेना

karanapen asatan drushti | shanka potin upajena

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कारणापें असतां दृष्टी । शंका पोटीं उपजेना ॥१॥ शूर मिरवे रणांगणीं । मरणीं च संतोषे ॥ध्रु.॥ पाहिजे तो कळवळा । मग बळा काय उणे ॥२॥ तुका म्हणे उदारपणें । काय उणें मनाचें ॥३॥