भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळ केळ नाम उच्चारितां नाहीं

kal kel nam uchcharitan nahin

काळ केळ नाम उच्चारितां नाहीं । दोन्ही पक्ष पाही उध्दरती ॥१॥ रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण । जड जीवां तारण हरि एक ॥२॥ हरि नाम सार जिव्हा या नामची । उपमा त्या दैवाची कोण वानी ॥३॥ ज्ञानदेवा सांग झाला नामपाठ । पूर्वजां वैकुंठ मार्ग सोपा ॥४॥