भजनी मालिका

भजने

हेंचि त्यांचे नित्य काम । दावणें धर्म विहिताचे ॥१॥ ज्याचें तया स्वहित जोडें । ऐसें उघडें बोलती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

हेचि माझें चित्ती । राहो आता भावप्रीती । विठ्ठल सुषुप्ती । जागृती स्वप्नासी ॥१॥ आणिक नाही मागणें । राज्यचाड संपत्ती धनें । जिव्हे सुख तेणें । घेता देई नाम तुझे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हेंदऱ्याचें भरितां कान । हलवी मान भोंक रितें ॥१॥ नाहीं मी येथें सांगों स्पष्ट । भावें नष्ट घेत नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हेमवंताच्या पोटीं एक जन्मली गोरटी । तये त्या धूर्जटी वरियलें ॥१॥ मंडपाच्या द्वारीं आला जंव नोवरा । अवगुणाचा म्हातारा रुप नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हो का पुत्र पत्नी बंधु । त्यांचा तोडावा संबंधु ॥१॥ कळों आलें खट्याळसें । शिवों नये लिंपों दोषें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम