भजनी मालिका
← भजनांकडे परत

हेचि वादकाची कळा । नाहीं येऊं येत बळा

hechi vadakachi kala | nahin yeun yet bala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हेचि वादकाची कळा । नाहीं येऊं येत बळा ॥१॥ धीर करावा करावा । तरी तो आहे आम्हां देवा ॥ध्रु.॥ रिघावें पोटांत । पायां पडोन घ्यावा अंत ॥२॥ तुका म्हणे वरी । गोडा आणावा उत्तरीं ॥३॥