भजनी मालिका
← भजनांकडे परत

हेंचि परमार्थाचे सार । हरीचिया उच्चार नामाचा

henchi paramarthache sar | harichiya uchchar namacha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
हेंचि परमार्थाचे सार । हरीचिया उच्चार नामाचा ॥१॥ जिहीं केला पावले ते । वैकुंठी सरते सुखी झाले ॥२॥ गातां वानितां हरि गुणरासी । झाले त्रैलोक्यासी पूज्य ते ॥३॥ निळा म्हणे निका उपावो । सांपडला ठावो वैष्णवां ॥४॥