भजनी मालिका
← भजनांकडे परत

हो कां नर अथवा नारी । ज्यांचा आवडता हरी

ho kan nar athava nari | jyancha avadata hari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हो कां नर अथवा नारी । ज्यांचा आवडता हरी ॥१॥ ते मज विठोबासमान । नमूं आवडी ते जन ॥ध्रु.॥ ज्याचें अंतर निर्मळ । त्याचें सबाह्य कोमळ ॥२॥ त्यांचा संग सर्वकाळ । घडो मज हे मंगळ ॥३॥ तुका म्हणे प्राण । काया कुरवंडी करीन ॥३॥