भजनी मालिका

भजने

सोहं नव्हें प्रपंच ज्ञान । अंतःकरण चतुष्टय योजन । इंद्रियांचे वर्तन । नव्हे सोहं ॥१॥ सोहं नव्हें विषयपंचक । सोहं नव्हे त्रैशोधक । सोहमाचा विवेक । विरळाचि जाणे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सोहं हंसा म्हणिजे तो मी मी तो ऐसे । हे वाक्य विश्वासे विवरावें ।। विवरावें अहंब्रह्मास्मि वचन । ब्रह्म सनातन तूंचि एक ।।

रचनाकार: संत रामदास

सोहमाची साक्षा मंत्र तोचि दीक्षा । तयाची परीक्षा सांगा मज ॥१॥ सोहमाचें ज्ञान निवडोनियां खूण । अनुभव मज जाण करावा जी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सौरी सुर झालें दुर डौर घेतला हातीं । माया मोह सांडवलें तीही लोकीं झालें सरती ॥१॥ चाल विठाबाई अवघी पांज देई । न धरीं गुज कांहीं वाळवंटीं सांपडतां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

स्तंभ फ़ोडीत कटकट । दाढा व्यंकट विकट । उध्दट वीर विकट । नरकेसरी ॥१॥ जिव्हा लळलळित लटलट । धुरधुरीत कंठ । श्वासें नासापुट उतट । पिंगट जटाजूट दाट ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

स्तवीनसे वाचे जोडोनियां कर । वेदां अगोचर ऐसें कांहीं ॥१॥ धन्य धन्य आतां उद्धरलों स्वभावें । माझें मज ठावें झालें निज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

स्तुति करीं जैसा नाहीं अधिकार । न कळे विचार योग्यतेचा ॥१॥ तुमचें मी दास संतांचें दुर्बळ । करूनि सांभाळ राखा पायीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

स्तुति करूं ऐसा नाहीं अधिकार। शिणला फणिवर वर्णवेना ॥१॥ तेथें मी सरता होईन कैशापरी। वर्णावया हरी कीर्ति तुझी॥२॥

रचनाकार: संत सेना

स्तुति करूं तरी नव्हे चि या वेदा । तेथें माझा धंदा कोणीकडे ॥१॥ परी हे वैखरी गोडावली सुखें । रसना रस मुखें इच्छीतसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

स्तुती अथवा निंदा करावी देवाची । अधम तो वेची व्यर्थ वाणी ॥१॥ आइकोनि होती बहिर हे बोल । वेचूनि ते मोल नरका जाती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

स्तुती तरि करूं काय कोणापासीं । कीर्त तरि कैसी वाखाणावी ॥१॥ खोटया तंव नाहीं अनुवादाचें काम । उरला भ्रम वरी बरा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

स्त्रिया पुत्र कळत्र हें तंव मायावंत । शेवटींचा अंत नाहीं कोणी ॥१॥ यमाचिये हातीं बांधोनियां देती । भूषणें ही घेती काढूनियां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम