भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्तवीनसे वाचे जोडोनियां कर । वेदां अगोचर ऐसें कांहीं

stavinase vache jodoniyan kar | vedan agochar aisen kanhin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
स्तवीनसे वाचे जोडोनियां कर । वेदां अगोचर ऐसें कांहीं ॥१॥ धन्य धन्य आतां उद्धरलों स्वभावें । माझें मज ठावें झालें निज ॥२॥ विश्वाच्या विसांव्या जिवाचिया जिवा । देवाचिया देवा दिनानाथा ॥३॥ सूंचि सर्वां आदिमायची अवधी । तुजविण कधीं दुजें नाहीं ॥४॥ एक तूं अनेक अनेकीं तूं एक । येणेही सांशंक बोलवेना ॥५॥ दातृत्वाची आदी कल्याणाची निधी । चित्तमन बुद्धि सर्व तूंची ॥६॥ तुझीये कृपेनें गेले भावाभाव । आणिक मागावें ऐसें नाहीं ॥७॥ कधींही कोणता चळेना ढळेना । माते ऐशा स्थाना बैसवावें ॥८॥ नामा म्हणे ऐसी करीत प्रार्थना । घाली लोटांगणा पायांवरी ॥९॥