भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्कंधी ऋषि तो वाहिला बळीनें द्वारपाळ केला

skandhi rushi to vahila balinen dvarapal kela

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
स्कंधी ऋषि तो वाहिला बळीनें द्वारपाळ केला ॥१॥ भक्ता आधीन होसी त्याच्या वचनीं वर्तसी ॥२॥ त्याचे गर्भवास सोसी । कष्टी होता अंबऋषी ॥३॥ सर्व दु:खासी साहिलें । जनी म्हणे बरवें केलें ॥४॥