भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोहंकारीं माया लक्ष आणीं देहीं

sohankarin maya laksha anin dehin

सोहंकारीं माया लक्ष आणीं देहीं । निरंजनीं पाहीं मायाकार ॥१॥ निर्गुण सगुण माया तेची खरी । प्रसऊनी निर्धारी वांझ असे ॥२॥ ज्ञानदेव म्हणे मज माया कृपाळु झाली । तिणें उजळली माझी काया ॥३॥