भजनी मालिका

भजने

सांडूनि पंढरी जासी आणिका तीर्था । लाज तुझ्या चित्ता कैसी नये ॥१॥ त्रिभुवनिचीं तीर्थें झालीं तीं मळीण । व्हा-वया पावन आलीं येथें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

साडेतीन पाउलें टाकिलीं निश्चळ । नेमियेलें स्थळ उत्तरायणी ॥१॥ देव म्हणे ज्ञाना होई सावधान । माग वरदान मज कांहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सांडोनि अभिमान जालों शरणागत । ऐसियाचा अंत पहासी काई ॥१॥ माझे गुणदोष मनीं गा न धरीं । पतित पावत जरी म्हण्नविसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सांडोनि संसार जालों मी अंकित । ऐशियाचा अंत पाहूं नको ॥१॥ पातकी मी सत्य पातकी मी सत्य । पातकी मी सत्य पांडुरंगा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सांडोनी आचार करती अनाचार । ब्रह्माचा विचार न कळे ज्यांसी ॥१॥ वाहाती भार वेदाचा आधार । शास्त्रांचा संभार सांगताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सात पांच गौळणी आलिया मिळोनी यशोदे गाऱ्हाणें देती कैसें । काय व्यालीस पोर चोरटें सिरजोर जनावेगळें ची कैसें।

रचनाकार: संत तुकाराम

सातवा जो गर्भ योगमाया नेत । आश्चर्य करीत मनामाजी ॥१॥ रोहिणी उदरीं नेवोनी घातला । न कळे कोणाला देवावीण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सातवा तो सर्वाठायीं वसे । शंकरादिक ध्याती तया अपेक्षा ॥१॥ तो सातवा हृदयीं आठवा । आठवितो तुटे जन्ममरण ठेवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सांता पांचां तरीं वचनां सेवटीं । निरोप कां भेटी एक तरी ॥१॥ कां नेणें निष्ठुर केलें नारायणा । न देखें हें मना येतां कांहीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

सातादिवसांचा जरी झाला उपवासी । तरीं कीर्तनासी टाकुं नये ॥१॥ फुटो हा मस्तक तुटो हें शरीर । नामाचा गजर सोडूं नये ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम