भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडोनि किर्तन। न करी आणिक साधन

sandoni kirtan| na kari anik sadhan

रचनाकार: संत सेना · अभंग
सांडोनि किर्तन। न करी आणिक साधन ॥१॥॥ पुरवा आवडीचे आर्त । तुम्हां आलों शरणागत ॥ २॥ मुखीं नाम वाहीन टाळी नाचेन निर्लज्ज राउळी ॥३॥ सेना म्हणे नुपेक्षावें हेंचि मागें जीवें भावें ॥४॥