भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडूनि पंढरी जासी आणिका तीर्था । लाज तुझ्या चित्ता कैसी नये

sanduni pandhari jasi anika tirtha | laj tujhya chitta kaisi naye

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सांडूनि पंढरी जासी आणिका तीर्था । लाज तुझ्या चित्ता कैसी नये ॥१॥ त्रिभुवनिचीं तीर्थें झालीं तीं मळीण । व्हा-वया पावन आलीं येथें ॥२॥ एवढा ब्रह्मानंद कैंचा आणिका ठायीं । जो या आहे पायीं विठोबाच्या ॥३॥ काळ मृत्यु दोन्ही घालोनि पायांतळीं । वाजलिया टाळी कीर्तनसंगें ॥४॥ नित्य नवी दिवाळी सुखाचा सोहळा । भोगिजे अवलीला संतसंगे ॥५॥ धर्म अर्थ काम मोक्ष मुक्ति चारी । देतो हा मुरारी नामें एका ॥६॥ नामा ह्मणे चला जाऊं पंढरिये । पाहूं बापमाये पांडुरंग ॥७॥