भजनी मालिका
← भजनांकडे परत

सात पांच गौळणी आलिया मिळोनी यशोदे गाऱ्हाणें देती कैसें

sat panch gaulani aliya miloni yashode garhanen deti kaisen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सात पांच गौळणी आलिया मिळोनी यशोदे गाऱ्हाणें देती कैसें । काय व्यालीस पोर चोरटें सिरजोर जनावेगळें ची कैसें। दहिं दुध लोणी शिंकां नुरे चि कांहीं कवाड जैशाचें तैसें । चाळवूनि नाशिली कन्याकुमरें आमुच्या सुनांसि लाविलें पिसें गे बाइये ॥१॥ आझुनि तरी यासि सांगें बरव्या परी । नाहीं तरी नाहीं उरी जीवेसाटी । मिळोनि सकळै जणी करूं वाखा । सखीं तुज मज होईल तुटी गे बाइये ॥ध्रु.॥ नेणे आपपर लौकिक वेव्हार । भलते ठायीं भलतें करी । पाळतुनि घरीं आम्ही नसतां । तेथें आपण संचार करी । सोगया चुंबन देतो आळिंगन । लोळे आमुच्या सेजाबाजावरी । शिंकीं कडाडा फोडी गोरसाचे डेरे धरितां न सांपडे करीं गे बाइये ॥२॥ आतां याची चाड नाहो आम्हां भीड । सांपतां कोड पुरवूं मनिचें । सोसिलें बहु दिस । नव्हता केला निस । म्हणुनि एकुलतें तुमचें । चरण खांबीं बांधेन जीवें । सरिसा जवें न चले कांहीं याचें । अर्थ प्राण देतां न सोडी सर्वथा । भलतें हो या जिवाचें गे बाइये ॥३॥ घेउनी जननी हातीं चक्रपाणी । देतिसे गौळणी वेळोवेळां । निष्ठुर वाद झणीं बोलाल सकळा । क्षोभ जाइल माझ्या बाळा । जेथें लागे हात वाढतें नवनीत अमृताच्या कल्लोळा । देखोनि तुकयास्वामी देश देहभाव विसरल्या सकळा गे बाइये ॥४॥