भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडूनि गुणदोषांची मात । करावा संघात संतांचा

sanduni gunadoshanchi mat | karava sanghat santancha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सांडूनि गुणदोषांची मात । करावा संघात संतांचा ॥१॥ साधकां हे सुगम वाट । वस्ती वैकुंठ पावावया ॥२॥ नित्य करितां हरीचीं कथा । दोषा दुरिता संहार ॥३॥ निळा म्हणे धरिल्या चित्तीं । भाविकां लाभती स्वानुभाव ॥४॥