भजनी मालिका

भजने

सर्वविशीं आह्मीं हे चि जोडी केली । स्वीमीची साधिली चरणसेवा ॥१॥ पाहिलें चि नाहीं मागें परतोनी । जिंकिला तो क्षणीं क्षण काळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सर्वविशीं माझा त्रासलासे जीव । आतां कोण भाव निवडू एक ॥१॥ संसाराची मज न साहे चि वार्ता । आणीक म्हणतां माझें कोणी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सर्वसुखाचिया आशा जन्म गेला । क्षण मुक्ती यत्न नाहीं केला । हिंडतां दिशा सीण पावला । मायावेष्टिला जीव माझा ॥१॥ माझें स्वहित नेणती कोणी । कांहीं न करितां मजवांचुनी । स्वजन तंव सुखमांडणी । नेणती कोणी आदि अंत ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सर्वसुखाची उघडली खाणी । श्रीमुख नयनीं पाहतां ॥१॥ मोक्षसुख आम्हां न लगे गा देवा । विश्रांतीसी ठेवा आणिकासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सर्वस्व बुडती ऐसी जे मातोक्ती। न धरावी चित्तीं साधकांनी ।। भरत तो मूर्ख काय होतां सांग। मातेचा तो त्याग। केला जेणें ।।

रचनाकार: संत रामदास

सर्वस्व हरुनी म्हणसी बळीसी । म्यां बांधिलें विचारिसे कोण कोण ॥१॥ द्वारी द्वारपाळ झालासी अंकीत । सांग बुद्धिमंत ऐसा कोण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सर्वस्वा मुकावें तेणें हरीसी जिंकावें । अर्थ प्राण जीवें देहत्याग ॥१॥ मोह ममता माया चाड नाहीं चिंता । विषयकंदुवेथा जाळूनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सर्वस्वाचा त्याग तो सदा सोंवळा । न लिंपे विटाळा अग्नी जैसा ॥१॥ सत्यवादी करी संसार सकळ । अलिप्त कमळ जळीं जैसें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सर्वही सुखाचें वोतिलें श्रीमुख । त्रिभुवन नायक पंढरीये ॥१॥ कर दोन्हीं कटीं सम पाय विटे । शोभले गोमतें बाळरूप ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

सर्वां आदि मुळ कळे अकळ । तो भक्त प्रतिपाळ भीमातीरीं ॥१॥ योगियांच्या ध्याना न ये अनुमाना । कैलासीचा राणा ध्यात ज्यासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सर्वा कालीं परमात्मा आहे सर्व देशीं । भावना हे अहर्निशीं दृढ धरी ॥१॥ संतसमुदाय मिळती जेथें जेथें । जाये तेथें तेथें लोटांगणीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव