भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वस्वाचा त्याग तो सदा सोंवळा । न लिंपे विटाळा अग्नी जैसा

sarvasvacha tyag to sada sonvala | na limpe vitala agni jaisa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सर्वस्वाचा त्याग तो सदा सोंवळा । न लिंपे विटाळा अग्नी जैसा ॥१॥ सत्यवादी करी संसार सकळ । अलिप्त कमळ जळीं जैसें ॥ध्रु.॥ घडे ज्या उपकार भूतांची दया । आत्मिस्थति तया अंगीं वसे ॥२॥ नो बोले गुणदोष नाइके जो कानीं । वर्तोनी तो जनीं जनार्दन ॥३॥ तुका म्हणे वर्म जाणितल्याविण । पावे करितां सीण सांडीमांडी ॥४॥