भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वसुख अधिकारी । मुखें उच्चारी हरीनाम

sarvasukh adhikari | mukhen uchchari harinam

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सर्वसुख अधिकारी । मुखें उच्चारी हरीनाम ॥१॥ सर्वांगें तो सर्वोत्तम । मुखीं नाम हरीचें ॥ध्रु.॥ ऐशी उभारिली बाहे। वेदीं पाहें पुराणीं ॥२॥ तुका म्हणे येथें कांही । संदेह नाहीं भरवसा ॥३॥