भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वविशीं माझा त्रासलासे जीव । आतां कोण भाव निवडू एक

sarvavishin majha trasalase jiv | atan kon bhav nivadu ek

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सर्वविशीं माझा त्रासलासे जीव । आतां कोण भाव निवडू एक ॥१॥ संसाराची मज न साहे चि वार्ता । आणीक म्हणतां माझें कोणी ॥ध्रु.॥ देहसुख कांहीं बोलिले उपचार । विष तें आदर बंद वाटे ॥२॥ उपाधि दाटणी प्रतिष्ठा गौरव । होय माझा जीव कासावीस ॥३॥ तुका म्हणे कांहीं आणीक न साहे । आवडती पाय वैष्णवांचे ॥२॥