भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वां आदि मुळ कळे अकळ । तो भक्त प्रतिपाळ भीमातीरीं

sarvan adi mul kale akal | to bhakta pratipal bhimatirin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्वां आदि मुळ कळे अकळ । तो भक्त प्रतिपाळ भीमातीरीं ॥१॥ योगियांच्या ध्याना न ये अनुमाना । कैलासीचा राणा ध्यात ज्यासी ॥२॥ शुकादिका ज्याचा वेध अहर्निशीं । तो उभा हृषीकेशी विटेवरी ॥३॥ एका जनार्दनीं ब्रह्मा परिपुर्ण । सगुण निर्गुण तोचि एक ॥४॥