भजनी मालिका

भजने

समुद्रांत पुत्र बुडाला रे माझा । पराक्रम तुझा ठावा असे ॥१॥ अवश्य म्हणोनी तेथोनी निघाले । समुद्रांत आले राम-कृष्ण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

समुळ मुळीं पाहतां पाहण्या उपरम । भोग भोक्ता तेथें सहज परब्रह्मा ॥१॥ भोगुं मी काय त्यागुं मी काय । त्याग भोग दोन्हीं चैतन्य माय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सये आनंदाचा अवचिता आला पुर । याचे मुरलीचर उठितांचि गजर । मी मज नाठवेचि कैचें घरदार । ठेलें तटस्थचि राहिलें शरीर वो ॥१॥ ऐसे मोहन नाटक येणें केलें । जीव चैतन्य वो हरुनि नेलें । एकलें एकवटचि करुनी ठेविलें । नाठवें सासुरें ना माहेर ऐसें झालें वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

संयोग सकळां असे सर्वकाळ । दुश्चित्त गोपाळ आला दिसे ॥१॥ गोपाळ गुणाचा म्हणे गुणमय । निंबलोण माये उतरिलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सरलियां खेळा गे म्हणती अवघ्या बाळा । आरते आरती करुं नंदाच्या गोवळा ॥१॥ हाचि जीव प्राण सोयरा सज्जन । ओवाळितां यासि बाई निवे तनुमन ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सरळीं हीं नामें उच्चारावीं सदा । हरी बा गोविंदा रामकृष्णा ॥१॥ पुण्य पर्वकाळ तीर्थे ही सकळ । कथा सिंधुजळ न्हाऊं येती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सरस्वती तीरीं अंबिकेचें स्थान । गोकुळींचे जन जाती तेथें ॥१॥ करोनी पूजन करिती प्रार्थना । नंदाच्या नंदना सुखी राखी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सरस्वती माते द्यावी मज स्फुर्ती । येतों काकुलती तुजलार्गीं ॥१॥ लाडकें लडिवाळ मागतसें तूज । वंदीन हे रज चरणींचे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सरितेचा ओघ सागरीं आटला । विदेही भेटला मनामन ॥ १ ॥ कवणाचे सांगातें पुसावया कवणातें । सांगतों ऐक तें तेथें कैचें ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

सरोवरीं कमळें तैसे तुझे नेत्र । त्याहूनि विचित्र दिस-ताती ॥१॥ कृपाळुवा ऐकें अगा ह्लषिकेशी । आह्मी तुझ्या दासी मोलविण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सर्प भुलोन गुंतला नादा । गारुडियें फांदां घातलासे। हिंडवुनि पोट भरी दारोदारीं । कोंडुनि पेटारी असेरया ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम