भजनी मालिका
← भजनांकडे परत

सरस्वती तीरीं अंबिकेचें स्थान । गोकुळींचे जन जाती तेथें

sarasvati tirin ambikechen sthan | gokulinche jan jati tethen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सरस्वती तीरीं अंबिकेचें स्थान । गोकुळींचे जन जाती तेथें ॥१॥ करोनी पूजन करिती प्रार्थना । नंदाच्या नंदना सुखी राखी ॥२॥ सारितां भोजन लपाला आदित्य । नामा ह्मणे तेथें राहाताती ॥३॥