भजनी मालिका

भजने

संन्यासी करी गृहस्थाश्रम । तेथें तया अधर्म वोढवला ॥१॥ करपात्रीं भिक्षा हाचि त्याचा धर्म । न करितां अधर्म स्वयें जोडे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संपत्ती देखोनि म्हणती माझें माझें । वागवितों वोझें खरा ऐसा ॥१॥ क्षणिक आयुष्य क्षणिक संपत्ती । न कळे तयाप्रती अंध जैसा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संपत्ती संतती मजला नावडे । स्वरुप आवडें तुझें देवा ॥१॥ तुझ्या रुपी सुख माझिया लोचनां । आणिक नारायणा न पाहती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संपदा सोहळा नावडे मनाला । करी तें टकळा पंढरीचा ॥१॥ जावें पंढरिसी आवडी मनासी । कधीं एकादशी आषाढी हे ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

संपदा सोहोळा नावडे मनाला । छंद हा लागला पंढरीचा ॥१॥ जावें पंढरीची आवडे मनासी । कधीं एकादशी आषाढी हे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सप्त अहोरात्र होतां । तेथें कृष्ण जळाअतोंता । सांगतां युध्दाची ते वार्ता । सर्पी विखारीं वेष्टिला ॥१॥ बोलिला उदंड विरुध्द वचनें । युध्दहि केलें अति सत्राणें । परी या त्रैलोक्यजीवनें । लाविली दोरी तया नाकीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सप्त दिन जेणें गोवर्धन धरिला । काळिया नाथिला देउनी पाय ॥१॥ तो हा गोपवेषें आला पंढरपुर । भक्त समाचारा विठ्ठल देवो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सप्त पाताळें एकवीस स्वर्गे पुरोनि उरला हरि । काया माया छाया विवर्जित दिसे तो आहे दुरी ना जवळी गे बाईये ॥ १ ॥

सप्तपुर्‍या क्षेत्र पवित्र सोपार । तयांमांजी श्रेष्ठ पंढरपुर ॥१॥ जा रे आधीं तया ठाया । जेथें वास वैकुंठराया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सप्तपुर्‍यांमांजीं पढरी पावन । नामघोष जाण वैष्णव करिती ॥१॥ देव तो विठ्ठल देव तो विठ्ठल । आहे सोपा बोल वाचेम म्हणतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सप्रेम निवृत्ति आणि ज्ञानदेव । मुक्ताईचा भाव विठ्ठल चरणीं ॥१॥ सोपान सांवता गोरा तो कुंभार । नरहरी सोनार प्रेम भरित ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

सब संबाल म्याने लौंडे खडा केऊं गुंग । मदिरथी मता हुवा भुलि पाडी भंग ॥१॥ आपसकुं संबाल आपसकुं संबाल । मुंढे खुब राख ताल । मुथिवोहि बोला नहीं तो करूँगा हाल ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सबराभरित देव असोनी जवळी । व्यर्थ ते कवळी मृत्तिका जळ ॥१॥ ज्याचीया सत्तेचा पंचभुत खेळ । विसरती गोपाळ तयालागीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संबाल यारा उपर तलें दोन्हो मारकी चोट । नजर करे सो ही राखे पश्वा जावे लुट ॥१॥ प्यार खुदाई प्यार खुदाई प्यार खुदाई । प्यार खुदाई रे बाबा जिकिर खुदाई ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सबाह्य अभ्यंतरीं देव आहे हा निर्धार । करुनी सत्वर मार्ग धरी ॥१॥ नुठवी सापत्न माता ऐसा धरुनी हेत । चालिला त्वरित वनालागीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ