भजनी मालिका
← भजनांकडे परत

संपदा सोहोळा नावडे मनाला । छंद हा लागला पंढरीचा

sampada sohola navade manala | chhand ha lagala pandharicha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संपदा सोहोळा नावडे मनाला । छंद हा लागला पंढरीचा ॥१॥ जावें पंढरीची आवडे मनासी । कधीं एकादशी आषाढी हे ॥२॥ आषाढी कार्तिकी कधीं ये ह्मणोनि । जातिया लागोनि पुसतसे ॥३॥ नामा ह्मणे ऐसें आर्त ज्याचे मनीं । त्याची चक्रपाणि वाट पाहे ॥४॥