भजनी मालिका
← भजनांकडे परत

संन्यासी करी गृहस्थाश्रम । तेथें तया अधर्म वोढवला

sannyasi kari gruhasthashram | tethen taya adharma vodhavala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संन्यासी करी गृहस्थाश्रम । तेथें तया अधर्म वोढवला ॥१॥ करपात्रीं भिक्षा हाचि त्याचा धर्म । न करितां अधर्म स्वयें जोडे ॥२॥ नाश करावे षड्‌वैरी नेमें । तया संन्यास कर्में म्हणिजेती ॥३॥ एका जनार्दनीं गृहस्थाची बरा । फजिती बाजारा उभ्या होय ॥४॥