भजनी मालिका
← भजनांकडे परत

सप्तपुर्‍या क्षेत्र पवित्र सोपार । तयांमांजी श्रेष्ठ पंढरपुर

saptapur‍ya kshetra pavitra sopar | tayammanji shreshtha pandharapur

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सप्तपुर्‍या क्षेत्र पवित्र सोपार । तयांमांजी श्रेष्ठ पंढरपुर ॥१॥ जा रे आधीं तया ठाया । जेथें वास वैकुंठराया ॥२॥ पुंडलिकांचे दारुशनें । तुटती प्राणीयांची बंधनें ॥३॥ स्नान करितां भीमेसी । पुर्वज उद्धरई सरसी ॥४॥ एका जनार्दनीं पावन । देव क्षेत्र तीर्थ उत्तम जाण ॥५॥