भजनी मालिका
← भजनांकडे परत

सप्रेम निवृत्ति आणि ज्ञानदेव । मुक्ताईचा भाव विठ्ठल चरणीं

saprem nivrutti ani dnyanadev | muktaicha bhav viththal charanin

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
सप्रेम निवृत्ति आणि ज्ञानदेव । मुक्ताईचा भाव विठ्ठल चरणीं ॥१॥ सोपान सांवता गोरा तो कुंभार । नरहरी सोनार प्रेम भरित ॥२॥ कबीर कमाल रोहिदास चांभार । आणिक अपार वैष्णव जन ॥३॥ चोखा तया पायीं घाली लोटांगण । वंदितो चरण प्रेमभावें ॥४॥